Wagholi – A new introduction of Pune city.

Wagholi – A new introduction of Pune city.

untitled-design10

वाघोली – पुणे शहराचे उपगनर म्हणून नवी ओळख :

पुणे जिल्हयातील अनेक ठिकाणे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत मात्र या दोन्हीही वातावरणाचा स्पर्श असलेली एक दुर्मिळ ठिकाण म्हणजे वाघोली. वाघोली तसेच पुणे शहरापासून १७ किमी अंतरावरचे मोठ्या लोकसंख्येचे जिल्ह्यातील एक गाव. या गावाची ओळख म्हणजे या गावाला पुणे शहराचे उपनगर म्हणून ही नवी ओळख आता होऊ लागली आहे. वाघोली परिसर हा पुणे अहमदनगर महामार्गाला लागून असून याच परिसरातील केसनंद, वाडेबोल्हाई, बकोरी, लोणीकंद, शिरसवडी, बिवरी, अष्टापूर, कोलवडी, थेऊर आदी भागांतील मध्यवर्ती भाग आहे. या भागात डोंगरांगाच्या सानिध्यात उभे राहत असलेली अनेक गृहप्रकल्प मध्यमवर्गीयांचे घरांचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. आणि यात एक लॅण्डमार्क प्रोजेक्ट म्हणून `सुयोग निसर्ग` (MahaRERA: P52100003483 ) प्रकल्पाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या वाघोलीनजीकच लोहगाव गाव व विमानतळ आहे तर महामार्गावरील गाव व पंचक्रोशीतील असल्याने शहराप्रमाणे १० ते २० मिनिटाच्या अंतरावर पुणे शहराकडे येणारी बससेवा मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याने शहर व गाव यांच्यातील अंतर खुप कमी झाले आहे.

वाघोली व परिसरात सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय वाघोली उपनगर व परिसरात इथे वाढणारी वाहतूक लक्षात घेतली असता त्याचा ताण सहन करण्यासाठी इथे सक्षम व उत्तम अशा दळणवळाच्या सोयी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या भागात पाण्याची चांगली उपलब्धता तसेच शुदध पिण्याच्या पाण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी मोठी व महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येते असल्याने येत्या काही वर्षांत वाघोली चे चित्र बदलताना दिसत आहे.

याशिवाय वाघोलीतील एैतिहासिक वारसा व पवित्र स्थान असलेल्या वाघेश्वराच्या दर्शनासाठी दिवसागणिक भाविकांची गर्दी वाढतेच आहे. याशिवाय वाडेबोल्हाईची बोल्हाई माता, थेऊरचा चिंतामणी गणपती ही धार्मिक स्थळे याच वाघोलीच्या परिसराला लागून असल्याने वाघोलीला धार्मिक दृष्टया अनन्यसाधारण असे महत्व आहे. वाघोली परिसरातील गावांत लहान मोठ्या अशा स्वरूपात अनेकांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक उत्तम प्रकल्प आकाराला येत आहेत. शहराच्या सीमवर्ती भागात असलेल्या वाघोली परिसरात सध्यादेखील आवाक्यातील घर उपलब्ध आहेत.

याशिवाय प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयपर्यंतचे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण देणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था असल्याने वाघोली शैक्षणिक दृष्ट्या सक्षमपणे आपला नावलौकिक वाढविताना दिसत आहे. या सर्व सोयी- सुविधांच्या पार्श्वभूमीवर इथे केलेली गुंतवणूक ही एक
योग्य निर्णय ठरणार आहे. यात तिळमात्रही शंका नाही…

‘सुयोग डेव्हलपर्स’ – चाळीस वर्षांची वैभवशाली परंपरा :
४० वर्षांपासून बांधकाम व्यवसायात असलेल्या या `सुयोग डेव्हलपर्स`ने ग्राहक विश्वासाला पुरेपूर अशी साद देत अनेक कुटुंबांना घरखरेदीचा आनंद मिळवून दिला आहे. सुयोगने गृह किंवा व्यावसायिक प्रकल्पांसाठी ज्या- ज्या भागांची निवड केली ती दूरदृष्टिकोनातून केली. `सुयोग`ची निवड सार्थ ठरवीत तो भाग भविष्यात मोठी मागणी असलेले उपनगर व लोकेशन बनलेले आहे. त्याचा वाघोलीचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. सर्वोत्तम सुविधांसह वाघोली तील` सुयोग निसर्ग` हा गृहप्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. इथे अनेक कुटुंब आता चांगलीच स्थिरावले आहेत. तेव्हा दर्जेदार घरांसाठीचा तुमचा शोध इथे थांबेल. घरखरेदीचा आनंद
मिळविण्यासाठी हा गृहप्रकल्प तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. असा विश्वास आहे.

img

Suyog Group

Related posts

  • Blog

`होम लोन ट्रानस्फर` करताय… आधी हे वाचा…

घर घेण्यासाठी एकदा प्रकल्पाची निवड...

Continue reading
by Suyog Group
  • Blog

ग्राहकहिताचा ‘रेरा’ कायदा

भारतीय परंपरेत आपलं स्वतःचं हक्काचं...

Continue reading
by Suyog Group

चांगल्या परताव्यासाठी लोकेशनमध्ये करा गुंतवणूक…

चांगल्या परताव्यासाठी लोकेशनमध्ये...

Continue reading
by Suyog Group
WhatsApp chat