`होम लोन ट्रानस्फर` करताय… आधी हे वाचा…

`होम लोन ट्रानस्फर` करताय… आधी हे वाचा…

home-loan-balance-transfer

घर घेण्यासाठी एकदा प्रकल्पाची निवड झाली की, आधी समोर प्रश्न उभा राहतो घरासाठी पैसा कसा उभा करायचा… आणि त्यासाठी मान्यातप्राप्त बँकेकडून घरकर्ज एक चांगला पर्याय आहे. यामुळे घराचे स्वप्न तर पूर्ण होतेच याशिवाय प्राप्तीकरातून वजावटीची एक प्रकारे अप्रत्यक्ष फायदा देखील मिळतो.

देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी गृह कर्जाच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे जे घरखरेदीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मात्र आता ज्या लोकांनी आधी गृहकर्ज घेतले आहेत ते गृहकर्जाचे जास्त व्याजदर आकारणार्या बॅंकेकडून कमी व्याजदर आकारणार्या बॅंकेकडे हस्तांतरण करू शकणार आहे.

गृहकर्जाचे हस्तांतरण करण्यासाठी पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे:

आपल्या बॅंकेशी संपर्क साधा:

बर्‍याचदा आपण ज्या बॅंकेकडून गृहकर्ज घेतले आहे ती बॅंक ‘वन-टाइम स्वीचिंग शुल्क’ आकरून तुमचे व्याजदर कमी करून देऊ शकते. त्यामुळे तुमचा दर महिन्याचा हप्ता देखील कमी होऊ शकतो. पण बॅंकेकडून ‘वन-टाइम स्वीचिंग शुल्क’ किती आकारले जाते आणि जर तुम्ही दुसर्‍या बॅंकेकडे गृहकर्जाचे हस्तांतरण केल्यानंतर तुमचा गृहकर्जाचा हप्ता किती कमी होतो आहे. याचा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घेणे गरजेचे आहे.

गृहकर्जाचे हस्तांतरण तुलनात्मक अभ्यास महत्त्वाचा:

बर्‍याचदा एका बॅंकेकडून दुसर्‍या बॅंकेकडे गृहकर्जाचे हस्तांतरण करताना ‘गृहकर्ज हस्तांतरण शुल्क’ (लोन ट्रान्स्फर शुल्क) भरावे लागते. आपण ज्या बॅंकेकडे गृहकर्ज हस्तांतरित करत आहोत ती बॅंक देखील आपल्याकडून ‘प्रक्रिया शुल्क’ आकरते. तर आपली आधीची बॅंक देखील ‘गृहकर्ज हस्तांतरण शुल्क’ देखील आकारते. शिवाय नवीन बॅंकेकडे कर्ज हस्तांतरण करताना ‘स्टॅम्प ड्यूटी’ देखील भरवी लागते. त्यामुळे लागणार्‍या सर्व खर्चाची माहिती घेऊनच गृहकर्ज हस्तांतरण करण्यास सुरूवात करावी.

गृहकर्जाचा प्रकार :
बॅंकेकडून मिळणार्‍या गृहकर्जावर दोन प्रकारचे व्याज आकारले जाते. म्हणजेच ग्राहक तरल (फ्लोटिंग) दराने गृहकर्ज घेऊ शकतो किंवा स्थिर दराने गृहकर्ज घेऊ शकतो.

– तरल (फ्लोटिंग) दराने गृहकर्ज : तरल दराने गृहकर्ज घेतल्यास ते मुख्यत: बाजारातील व्याजदर बदलतो त्यानुसार बदलत असते. आरबीआयकडून द्विमाही पतधोरण आढावा घेतला जातो. त्यानुसार इतर बँकांकडून कर्जाचे दर बदलले जातात. वाढत्या स्पर्धेमुळे आणि जास्तीतजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांकडून गृहकर्जाचे दर कमी केले जातात.

-स्थिर दर : बर्‍याच गृहकर्जदारांकडून स्थिर दराचा पर्याय आकाराला जातो. यामध्ये गृहकर्ज घेतेवेळीच एक दर निश्चित केला जातो. त्यानुसार कायम त्याच दराने बॅंकेकडून कर्जाचा दर आकारला जातो.
त्यामुळे गृहकर्जदाराने तरल दराने गृहकर्ज घेतले असल्यास त्यावर कोणतेही मुदतपूर्व परतफेडीसाठी दंड (प्री-पेमेण्ट पेनल्टी) लागत नाही. मात्र स्थिर दराने गृहकर्ज घेतले असल्यास कर्जाच्या उर्वरित कर्जाच्या रक्कमेवर प्री-पेमेण्ट पेनल्टी लागण्याची शक्यता असते.

– बॅंकेचा हप्ता चुकवल्यास अडचणी : गृहकर्जदाराकडून बर्‍याचदा बॅंकेचा हप्ता थकल्यास दुसर्‍या बॅंकेकडे गृहकर्जाचे हस्तांतरण करताना अडचण येण्याची शक्यता असते. त्यामुळे हप्ता चुकवल्यास नवीन बॅंक कर्जदाराला कर्जाचे हस्तांतरण करण्यास नकार देते.

वाढीव कर्ज (टॉपअप लोन) :

गृहकर्जाचे हस्तांतरण करताना नवीन बॅंकेकडून आपल्याला टॉप-अप अर्थात वाढीव कर्जही मिळू शकते. मात्र यासाठी आपला आधीच्या बॅंकेतील कर्जाचा ‘रेकॉर्ड’ चांगला असणे गरजेचे आहे. गृहकर्जाचे हस्तांतरण केलेल्या बॅंकेकडे आपल्याला गृहकर्ज हप्ता फेडण्याच्या कालावधीत देखील आपण कपात करू शकतो.

आपण घेत असलेल्या गृहकर्जाचे योग्य माहिती आणि तुलनात्मक अभ्यास करून हस्तांतरण केल्यास व्याजदरापोटी भरल्या जाणाऱ्या रक्कमेत मोठी बचत होऊ शकते.

img

Suyog Group

Related posts

  • Blog

Wagholi – A new introduction of Pune city.

वाघोली - पुणे शहराचे उपगनर म्हणून नवी...

Continue reading
by Suyog Group
  • Blog

ग्राहकहिताचा ‘रेरा’ कायदा

भारतीय परंपरेत आपलं स्वतःचं हक्काचं...

Continue reading
by Suyog Group

चांगल्या परताव्यासाठी लोकेशनमध्ये करा गुंतवणूक…

चांगल्या परताव्यासाठी लोकेशनमध्ये...

Continue reading
by Suyog Group
WhatsApp chat