हरित इमारती म्हणजे काय?

हरित इमारती म्हणजे काय?

greenhome

देशाच्या प्रगतीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचा महत्त्वाचा वाटा आहे. एखाद्या शहराचा विकास मोजण्यासाठी तिथल्या आधारभूत सुविधा आणि पर्यायाने बांधकाम क्षेत्रातील वाढ हे एकक ग्राह्य धरल जातं. थोडक्यात, गगनचुंबी इमारती, विमानतळ, मेट्रो, रुंद रस्ते यांसारखे प्रकल्प झाले की विकास झाला अशी सर्वसामान्य समजूत आहे. परंतू पर्यावरणाकडे आपण लक्ष दिले नाही तर वाढतं तापमान, पाण्याचा तुटवडा, घनकचऱ्याचा प्रश्न, सांडपणी व्यवस्थापनाचा प्रश्न, आणि पाणी प्रदूषणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

यालाच विकासाचे नकारात्मक परिणाम असही म्हणता येईल. याचं कारण आहे विकासाबद्दल असलेल्या आपल्या काही ठराविक संकल्पना. हे सर्व टाळून विकास करता येणं शक्य आहे का ? तर होय !
जर आपण इमारत बांधतानाच भोवतालच्या निसर्गाचा आणि आपल्या गरजांचा विचार केला तर नक्कीच आपण जास्तीत जास्त पर्यावरण पूरक निर्मिती करू शकू. यासाठी आपण पर्यावरण पूरक इमारत अर्थात “GREEN BUILDING” म्हणजे काय ते समजून घेऊ. Green building म्हणजे अशी इमारत जिच्या नियोजन (design), निर्माण (construction) वापर (maintenance) आणि आयुष्य संपल्यावर पाडताना (demolition) कमीत कमी ऊर्जेचा व संसाधनांचा वापर होतो.

रचना /Design:

पर्यावरण पूरक इमारतीच नियोजन करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो, उदा. सूर्याचे भ्रमण चक्र (sun path), विविध ऋतूतील प्रकाश व्यवस्था, हवेचा प्रवाह, जमिनीचा नैसर्गिक उतार, जमिनीवरील व खालील पाण्याचा प्रवाह, स्थानिक परिसंस्था इत्यादी. आताच्या तंत्रज्ञाना मुळे त्यातील बर्याच गोष्टींच software simulation द्वारे त्या ठिकाणची मागील अनेक वर्षांची प्रत्येक ऋतूमानातील हवामानासबंधी माहीती (weather data) संक्रमीत (virtually sync) करून अपेक्षीत परिणामही तपासता येतात व त्यानुसार रचनेत बदल करता येतो.

ह्या नंतर येतो महत्वाचा टप्पा, प्रत्यक्ष निर्मीती. यात अनेक नेहेमीच्या सामग्री व बांधकामाच्या पद्धतींना अधिक पर्यावरणस्नेही तसेच घातक रसायनमुक्त ( Non Toxic ) पर्याय वापरला जातो, व यामुळे आल्हाददायक व निरोगी वातावरण राखण्यास निश्चितच मदत होते.
अशा इमारतींच्या वापरात अर्थात maintenance करताना सुद्धा कमीत कमी ऊर्जेचा व संसाधनांचा वापर होईल अशी योजना केलेली असते व यामुळेच विज व पाण्याच्या स्रोतांवर पुरवठा करण्यासाठी अतिरीक्त ताण येत नाही. आणि होणारा अतिरीक्त खर्चही वाचतो.
याबरोबरच जुन्या इमारतींचे आयुष्य संपल्यावर तयार होणाऱ्या राडारोड्याची योग्यरितीने विल्हेवाट लावणे ही सुद्धा दिवसेंदिवस वाढणारी समस्या आहे. पर्यावरणस्नेही इमारत बांधताना याचा विचार केल्यामुळे पुनर्वापरायोग्य साहीत्याचा वापर केला जातो तसेच पुर्वी वापरलेल्या साहीत्याचा पुनर्वापर सुद्धा केला जातो. अशाप्रकारे “Green Building” ही खऱ्या अर्थाने सुरवातीपासून शेवटपर्यंत अगदी १०० टक्के नसली तरी जास्तीतजास्त पर्यावरणस्नेही असू शकते.

पर्यावरणपूरक घरांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक फायदे आहेत :

– पर्यावरणपूरक पद्धतीने बांधलेल्या घराचा देखभाल खर्च कमीत कमी असतो व तो आपल्याला शून्यापर्यंत नेता येतो.
– वातावरणातील बदलांना पर्यावरणस्नेही घर चटकन जुळवून घेते आणि त्यामुळेच ते उन्हात थंडावा आणि थंडीत उदारपणा देतं.

– इमारतीभोवती स्थानिक झाडे व निसर्ग जपल्यामुळे त्या आवारात परिसंस्था तयार होते.
आपलं कुटुंब वीज, पाणी, फळे, भाजीपाला अशा अनेक बाबतीत स्वावलंबी होतं.

– आपण नवीन घर बांधताना किंवा घेताना नक्कीच या गोष्टींचा विचार करायला हवा परंतु आपण सध्या राहत असलेल्या घराला सुद्धा जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा करता येईल ते पाहू या :

– घराभोवती मोकळ्या जागेत बाराही महिने खुप पाणी लागणारी हिरवळ (Lawn) व अन्य विदेशी झाडे लावण्यापेक्षा अनेक सुंदर स्थानिक वृक्ष, झुडपं, वेली यांचा वापर लँडस्केपिंग करताना आपण करू शकतो त्यामुळे स्थानिक प्राणी, पक्षी, मधमाश्या व फुलपाखरांसारखे सारखे कीटक यांना आसरा तर मिळेलच शिवाय आपल्याला प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फळे, भाजीपाला, औषधी सुद्धा मिळतील.

– सांडपाणी व स्वयंपाक घरातील पाणी थेट ड्रेनेजला जोडण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लहानसा biological treatment plant उभा करू शकतो ज्यात कोणत्याही बाह्य ऊर्जेशिवाय व खर्चाशिवाय पाणी 96% पर्यंत शुद्ध होते व ते पुन्हा गाडी धुण्यासाठी, बागेसाठी व फ्लशिंगसाठी वापरता येते.

– अंतर्गत रस्ता सोडून मोकळ्या जागेत सच्छिद्र पेव्हिंग करू शकतो ज्यामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता व साचून न राहता जमिनीत प्रभावीपणे मुरेल.

– दररोज तयार होणारा ओला कचरा घरीच कुजवता येईल व तो परसबागेत, टेरेस गार्डनमध्ये वापरता येईल.

हे सर्व लक्षात घेता सगळंच जरी शक्य नसेल तरी आपल्या गरजेनुसार व इच्छेनुसार सुरवात करता येईल व नक्कीच सकारात्मक बदल घडवता येईल.

img

Suyog Group

Related posts

पुण्यातील हार्ट ऑफ सिटी कोथरूडची नजीकता असलेला गृहप्रकल्प

देमागील काही वर्षांचा विचार केला तर...

Continue reading
by Suyog Group
WhatsApp chat