‘सुयोग ऑरा’ – सुवर्णसंधी परिपूर्ण लोकेशन व सुविधांची…

‘सुयोग ऑरा’ – सुवर्णसंधी परिपूर्ण लोकेशन व सुविधांची…
फार वर्षांपूर्वी नव्हे तर साधारण काही वर्षांपूर्वीच `कोथरूड अॅनेक्स` अशी ओळख वारजे भागाने मिळवली. या ओळखीची फार काळ मदत न घेता मुंबई-बंगळुरू `एक्स्प्रेस वे` वरचे उपनगर, चांदनी चौकाची नजीकता, मध्यमवर्गीयांची पसंती असलेले उपनगर हॉट लोकेशन ठरू पाहत असलेल्या प्रतिष्ठित वारजे भागात गुंतवणूकीचा निर्णय म्हणजे उत्तम परतावा देणारा निर्णय ठरला आहे. आणि अशा गुंतवणूकीसाठी `सुयोग डेव्हलपर्स`चा `ऑरा` हा गृहप्रकल्प एक सर्वोत्तम पर्याय आहे.
कोथरूड अॅनेक्स`मधील ‘सुयोग ऑरा’
कोथरूड म्हणजे ‘हार्ट ऑफ द सिटी’. कोथरूडला सर्वांत नजीकचा असलेला व सर्व सुविधांनी युक्त अशा वारजे हा आता शहरातीलच भाग बनला आहे. या ठिकाणी अगदी सहा पदरी मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतचे उपनगर, मध्यमवर्गीयांची पसंती असलेले हॉट लोकेशन म्हणून वारजे समोर आले आहे…
या अशा वेगळ्या व महत्त्वाच्या ठिकाणामुळे हा भाग सुरवातीपासूनच मागणी असलेले उपनगर आहे. जुन्या घरांची आणि सोसायट्यांची जागा आता मोठ्या व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा सोसायट्या घेत असून त्याठिकाणी सर्व अत्यावश्यक पायाभूत सुविधा तयार आहेत. महामार्गालगत पुरेसे व पक्के सर्व्हिस रोड, राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या शाखा, मॉल, नामवंत हॉस्पीटल, बागा या व परिपूर्ण जीवनशैलीसाठीच्या सर्व प्रकारच्या सुविधा इथे आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे घराच्या निवडीसाठी या उपनगराची निवड एक सुयोग्य निर्णय ठरणारा आहे..
शहरा नजीकच्या एका चांगल्या लोकशनसाठी वारजेमधील सिप्ला कंपनीच्यासमोरच्या बाजूस असलेला २ बीएचके सदनिकांचा प्रशस्त व आरामदायी असलेला ‘सुयोग ऑरा’ हा गृहप्रकल्प (RERA No. P52100003242) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पीएमआरडीए मान्यताप्राप्त व रेरा नोंदणीकृत असलेले या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील घरांसाठीची नोंदणी सुरू असून पहिल्या टप्प्यातील ८७ कुटूंब इथे राहायला देखील आलेली आहेत.
दर्जेदार सुविधा
‘सुयोग ऑरा’ मध्ये २ बीएचकेच्या सदनिका असून तुम्हाला आरामदायी प्रकल्पांतील बहूतांश सुविधा इथे देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्यामध्ये भव्य असे एंटरन्स गेट, लहान मुलांसाठी खेळण्याची पुरेशी जागा, क्लब हाऊस, कार पार्किंग, पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेली सुविधांची जागा, पेट्रोलपंप, मनमोहक असे लॅण्डस्केप, सोसायटीमधील वातावरण भक्तिमय करणारे मंदीर तुम्हाला या सोसायटीच्या परिसरात उपलब्ध असणार आहेत.
‘सुयोग डेव्हलपर्स’ – चाळीस वर्षांची वैभवशाली परंपरा
४० वर्षांपासून बांधकाम व्यवसायात असलेल्या या सुयोग डेव्हलपर्सने ग्राहकांच्या विश्वासाला पुरेपूर अशी साद देत अनेक कुटुंबांना घरखरेदीचा आनंद मिळवून दिला आहे. सुयोगने गृह किंवा व्यावसायिक प्रकल्पांसाठी ज्या- ज्या भागांची निवड केली ती दूरदृष्टिकोनातून केली. `सुयोग`ची निवड सार्थ ठरवीत तो भाग भविष्यात मोठी मागणी असलेले उपनगर व लोकेशन बनलेले आहे. तेव्हा सर्वोत्तम सुविधांसह वारजे भागातील `सुयोग ऑरा` प्रकल्पाच दर्जेदार घरांसाठीचा तुमचा शोध इथे थांबेल. घरखरेदीचा आनंद मिळविण्यासाठी हा गृहप्रकल्प तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल, असे विश्वासाने नमूद करावेसे वाटते…