पुण्यातील हार्ट ऑफ सिटी कोथरूडची नजीकता असलेला गृहप्रकल्प

पुण्यातील हार्ट ऑफ सिटी कोथरूडची नजीकता असलेला गृहप्रकल्प

देमागील काही वर्षांचा विचार केला तर रिअल इस्टेटमध्ये आलेल्या चढ-उतारांमुळे काहीसे गोंधळाचे वातावरण होते मात्र रेरा कायदा, जीएसटीची नवी करप्रणाली या अशा कायद्यांनी व निर्णयांनी या क्षेत्रात एक आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकांना खरेदीपूर्व व पश्चात व्यवहारांमध्ये विश्वासार्हतेला अधिक बळ मिळाले आहे.
पुण्यनगरीने राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. देशातील ४० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं व जवळपास चौदा निकषांवर या सगळ्या महत्वाच्या शहरांची तुलना करण्यात आली. त्यातूनच पुण्याला राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत पहिलं स्थान मिळालं. सुरक्षा व सुरक्षितता, वीज पुरवठा, खात्रीशीर पाणीपुरवठा, जमीनीचा मिश्र वापर, अर्थव्यवस्था व रोजगार, प्रशासन, आरोग्य, गृहबांधणी समावेशकता, ओळख व संस्कृती, शिक्षण, सार्वजनिक ठिकाणे, प्रदूषणात घट, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व सर्वात शेवटचे म्हणजे परिवहन व गतिशीलता या चौदा निकषांवर हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
वारजे – कोथरूड विस्तारित उपनगर
कोथरूड म्हणजे प्रतिष्ठेचा निवास, ‘हार्ट ऑफ द सिटी’. कोथरूडला सर्वांत नजीकचा असलेला व सर्व सुविधांनी युक्त अशा वारजे हा आता शहराचाच भाग बनला आहे. या ठिकाणी अगदीसहा पदरी मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतचे उपनगर, मध्यमवर्गीयांची पसंती असलेले हॉट लोकेशन म्हणून वारजे उपनगर समोर आले आहे. अशा या वेगळ्या व महत्त्वाच्या लोकशनमुळे वारजे मागणी असलेले उपनगर आहे. जुन्या घरांची आणि सोसायट्यांची जागा आता मोठ्या व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा सोसायट्यांनी घेतली आहे. त्याठिकाणी सर्व अत्यावश्यक पायाभूत सुविधा बहूतांश प्रमाणात तयार आहेत.
वारजे – डिमांडिंग लोकेशन
शहरा नजीकच्या एका चांगल्या लोकशनसाठी वारजेमधील सिप्ला फॉऊंडेशन समोरच्या बाजूस असलेला २ बीएचके सदनिकांचा प्रशस्त व आरामदायी असलेला ‘सुयोग ऑरा’ हा गृहप्रकल्प (RERA No. P52100003242) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पीएमआरडीए मान्यताप्राप्त व रेरा नोंदणीकृत असलेले या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील घरांसाठीची नोंदणी सुरू असून पहिल्या टप्प्यातील ८७ कुटूंब इथे राहायला देखील आलेली आहेत.

विशेष म्हणजे स्वतःचं हक्काचं पहिलंच घर घेणाऱ्यांसाठी `पीएमएवाय` म्हणजेच प्रधानमंत्री आवाज योजना. या योजनेतंर्गत सर्वसाधारणपणे पात्र व स्वतः पहिलं घर घेत असलेल्या प्रत्येक घरखरेदीदारास २.६७ लाख रूपये इतके अनुदान केंद्र शासनातर्फे मिळते. विशेष म्हणजे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. `सुयोग डेव्हलपर्स`च्या प्रकल्पांत घर घेऊन तुम्ही देखील या सवलतींचा लाभ घेऊ शकता.

सुयोग ऑरा – मोस्ट लिव्हेबल प्रोजेक्ट
वारजेमधील सिप्ला फॉऊंडेशन समोरच्या बाजूस असलेला २ बीएचके सदनिकांचा प्रशस्त व आरामदायी असलेला ‘सुयोग ऑरा’ हा गृहप्रकल्प निवास व गुंतवणूकासाठी एक उत्तम पर्याय आहे. PMC मान्यताप्राप्त व रेरा नोंदणीकृत असलेले या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील घरांसाठीची नोंदणी सुरू असून पहिल्या टप्प्यातील ८७ हून अधिक कुटूंब इथे राहायला देखील आलेली आहेत. ‘सुयोग ऑरा’ त २ बीएचकेच्या सदनिका असून तुम्हाला आरामदायी प्रकल्पांतील बहूतांश सुविधा इथे देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्यामध्ये भव्य असे प्रवेशद्वार, लहान मुलांसाठी खेळण्याची पुरेशी जागा, क्लब हाऊस, कार पार्किंग, सोलर सिस्टिम, पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेली सुविधांची जागा, मनमोहक असे लॅण्डस्केप, सोसायटीमधील वातावरण भक्तिमय करणारे मंदिर तुम्हाला या सोसायटीच्या परिसरात उपलब्ध असणार आहे.

‘सुयोग डेव्हलपर्स’ – एक्केचाळीस वर्षांची वैभवशाली परंपरा
४१ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात असलेल्या या सुयोग डेव्हलपर्सने ग्राहकांच्या विश्वासाला पुरेपूर अशी साद देत अनेक कुटुंबांना घरखरेदीचा आनंद मिळवून दिला आहे. सुयोगने गृह किंवा व्यावसायिक प्रकल्पांसाठी ज्या- ज्या भागांची निवड केली ती दूरदृष्टिकोनातून केली. ‘सुयोग’ची निवड सार्थ ठरवीत तो भाग भविष्यात मोठी मागणी असलेले उपनगर व लोकेशन बनलेले आहे.
गुंतवणूकासाठी हाच काळ योग्य का?
मागील काही महिन्यांपासून रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीसंबंधाने पूरक अशा बातम्या येत आहे. केंद्र व राज्य सरकार तशा प्रकारची निर्णय व धोरणे जाहीर करते आहे. त्यापैकीच काही निर्णय व धोरणे खालील प्रमाणे आहेत. ज्याचा परिणाम म्हणून येत्या काळात रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीला मागणी असणार आहे.

ती कारणे कोणती याचा एक आढावा आपण घेवूयात ती खालीलप्रमाणे
आगामी आर्थिक वर्षासाठीसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक मिळून सुमारे साडेसहा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार असल्याने गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. या उद्देशाने रिअल इस्टेटमधील गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे.
अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार कॅपिटल गेनचा फायदा आता दोन घरांसाठी देऊ करण्यात आला आहे. याआधी तो एका घरासाठीच मिळायचा त्यामुळे घरातील गुंतवणूकीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे.
प्राप्तीकरासाठी घर कर्जावरील व्याजदरात मिळणारी सवलत दोन लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याआधी ती दीड लाख होती. या निर्णयामुळे ग्राहक व गुंतवणूकदार अधिकाधिक घरकर्जावरील व्याजदारांचा फायदा करून घेत होते, त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करावा लागणार आहे. अनेकजण प्राप्तीकरातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीला अधिक प्राधान्य देताना दिसतील.
याशिवाय वेतनधारकांच्या `स्टॅंडर्ड डिडक्शन` ४० हजारावरून ५० हजार करण्यात आली आहे तसेच घरांच्या भाड्यावर लागू होणारा टीडीएस १ लाख ८० हजारावरून ती २ लाख ४० इतकी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे देखील वेतनधारकांची मोठी रक्कम बचत होणार आहे. त्यामुळे देखील बचत होणाऱ्या रकमेच्या आधारे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढताना दिसेल.

इतर तरतुदी ज्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकीला येत्या काळात मागणी असणार आहे.

केंद्र सरकार पाठोपाठ, राज्य सरकारने देखील सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे वेतनामध्ये झालेली लक्षणीय वाढ, हाती शिल्लक राहणारा पैशांमुळे गुंतवणूकासाठी एक प्रोत्साहनाचे वातावरण निर्माण होताना दिसणार आहे.
घर खरेदीला चालना मिळावी यासाठी जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर करण्यात येणार आहे. जीएसटी संबंधातील या मोठ्या व महत्त्वाच्या निर्णयामुळे घरांच्या किंमती आवाक्यात येतील.

img

Suyog Group

Related posts

हरित इमारती म्हणजे काय?

देशाच्या प्रगतीमध्ये पायाभूत...

Continue reading
by Suyog Group
WhatsApp chat